पुणेकरांना नववर्षात भेट! पिंपरी चिंचवड-पुण्यादरम्यान धावली 'मेट्रो'

मुंबई तक

नव्या वर्षात पुण्याहून पिंपरी चिंचवडला जाणं किंवा पिंपरी चिंचवडहून पुण्यात येण्यासाठी वेळ कमी होणार आहे.

पुणे मेट्रोच्या वतीने फुगेवाडी (पिंपरी चिंचवड मनपा हद्द) ते सिव्हिल कोर्ट (पुणे मनपा हद्द) आणि सिव्हिल कोर्ट (उन्नत स्थानक) ते वनाझ (उन्नत स्थानक) या लाईनवर ट्रायल रन घेण्यात आली.

पिंपरी ते ते वनाज, कोथरूड या 15 किलोमीटर अंतराच्या मार्गावर पुणे मेट्रोची चाचणी शनिवारी (31 डिसेंबर 2022) यशस्वी पार पडली.

हा मार्ग एलिव्हेटेड (उन्नत) व भुयारी असा दोन्ही पद्धतीचा आहे. या चाचणीमुळे पिंपरी-चिंचवड औद्योगिक शहर व पुणे शहर मेट्रोने जोडलं गेलं आहे.

पुढील 2 ते 3 महिन्यांत या मार्गावरील मेट्रोतून नागरिकांना प्रवास करता येणार आहे. पिंपरी ते वनाज प्रवासासाठी 40 रूपये तिकीट असणार आहे.