Kalyan : ३ शार्प शूटर्संना नाट्यमयरित्या अटक... पंजाबमधून केला होता पोबारा

मिथिलेश गुप्ता, प्रतिनिधी (कल्याण)

कल्याणमधून पंजाब अँटी गँगस्टर टास्क फोर्स, मुंबई एटीएस आणि खडकपाडा पोलिसांनी धाड टाकून तीन जणांना ताब्यात घेतलं.

मिळालेल्या माहितीनुसार, हे तिन्ही शार्प शूटर्स असून ते पंजाबमधील खत्री गँगचे सदस्य आहेत.

हे तिन्ही शार्प शूटर्स मख्खन सिंग हत्या प्रकरणात मुख्य संशयित आरोपी आहेत.

शुभम उर्फ महाबोंन अवतार सिंग, गुरुमुख सिंग, अमनदिप कुमार अशी या तिघांची नाव आहेत.

मोहालीचे डीवायएसपी राजन सिंह आणि त्यांची टीम मागील अनेक दिवसांपासून या शार्प शूटर्सच्या मागावर होती.

पोलिसांच्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सर्व आरोपींना खडकपाडा पोलिस ठाण्यात आणण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे.