योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर
सोन्याच्या शाईने लिहिलेल्या कुराणाच्या जगात केवळ चारच प्रती आहेत.
इस्लाम धर्माच्या या पवित्र धर्मग्रंथांच्या चारही प्रती भारताचाच आहेत.
सालारगंज म्युझियम हैदराबाद, खुदाबक्ष लायब्ररी पटना, नॅशनल म्युझियम दिल्ली आणि चौथी प्रत रिसर्च फॉर रिसर्जन फाउंडेशन नागपूरमध्ये आहे.
सूक्ष्म हस्ताक्षरात ही कुराण लिहिण्यात आली असून सहजरित्या वाचता येते हे या कुराणची मुख्य वैशिष्ट्य आहे.
कुफी आणि नश्तलीक या जगातील सर्वोत्कृष्ट दोन अरबी लिपी म्हणून ओळखल्या जातात. त्यापैकी नश्तलीक या लिपीमध्ये हे कुराण लिहिण्यात आलं आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इंडियन सायन्स काँग्रेस मेळाव्यात रिसर्च फॉर रिसर्जन फाउंडेशन नागपूरच्या स्टॉलमध्ये हा ग्रंथ ठेवण्यात आला आहे.