मुंबई तक
अंबानींच्या घरी लगीन घाई सुरू झाली आहे. नुकतंच, अनंत अंबानीचा राधिका मर्चंटशी साखरपुडा झाला.
साखरपुड्यानंतर, दिसायला अगदी देखणी आणि स्टायलिश असणारी राधिका मर्चंट कोण असा प्रश्न सर्वांना पडला होता.
राधिकाचे वडीलही उद्योजक आहेत. ते एनकोर हेल्थकेअरचे सीईओ आहेत.
अनंत आणि राधिका हे बालपणीचे मित्र-मैत्रीण आहेत. त्यांच्या बालपणीच्या मैत्रीचे आता प्रेमात रूपांतर झालं आहे.
राधिका एक क्लासिकल नृत्यांगना आहे. मागेच, अंबानी कुटुंबाने तिचा अरंगेत्रम कार्यक्रम जियो वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित केला होता.
राधिका मर्चंटने न्यू यॉर्क यूनिव्हर्सिटीमधून पॉलिटिक्स आणि इकोनॉमिक्समधून शिक्षण पूर्ण केले आहे.
राधिकाच्या सौंदर्याने आणि स्टाईलने लाखो लोक तिचे चाहते झाले आहेत.