सम्मेद शिखर वाद : राज ठाकरेंची मोदी सरकारकडे मागणी

मुंबई तक

जैन धर्मीयांचे पवित्र स्थळ असलेल्या सम्मेद शिखरजी स्थळाला झारखंड सरकारने पर्यटन क्षेत्राचा दर्जा दिलाय.
अनेक ठिकाणी जैन धर्मीय रस्त्यावर उतरले असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी याकडे केंद्राचं लक्ष्य वेधलंय.
राज ठाकरे म्हणतात, "झारखंडमधल्या गिरीहीद जिल्ह्यातलं 'सम्मेद शिखरस्थळ' हे जैन धर्मियांचं पवित्रस्थळ आहे. ह्या धर्मस्थळाला पर्यटनस्थळाचा दर्जा देऊ नये."
"एकदा का ते पर्यटनस्थळ म्हणून घोषित झालं की तिथे जैन धर्माला मान्य नसलेल्या अनेक गोष्टी घडू शकतील अशी जैन बांधवांची भावना आहे."
"महाराष्ट्र नवनिर्माण सेना जैन बांधवांच्या मागणीशी पूर्ण सहमत आहे", असं सांगत राज ठाकरेंनी पाठिंबा दिलाय.
"झारखंड सरकारने जैन धर्मियांच्या तीव्र भावनांचा विचार करून हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा", अशी मागणी राज ठाकरेंनी केलीये.
"हे होत नसेल तर केंद्र सरकारने ह्यात त्वरित हालचाल करावी", असं म्हणत राज ठाकरेंनी मोदी सरकारला हस्तक्षेप करण्याचा सल्ला दिलाय.