मुंबई तक
राकेश झुनझुनवाला हे आता फारसं अपरिचित राहिलेलं नाही. शेअर मार्केटचे बिग बुल, भारतातील वॉरेन बफे अशा विशेषांनीही त्यांना ओळखलं जातं. झुनझुनवाला यांचं जसं शेअर मार्केट बरोबर कनेक्शन आहे, तसंच त्यांचं बॉलिवडूनशीही कनेक्शन राहिलंय.
शेअर मार्केट किंग असलेल्या राकेश झुनझुनवाला यांनी १४ ऑगस्ट २०२२ रोजी अखेरचा श्वास घेतला. ब्रीच कॅण्डी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं.
राकेश झुनझुनवाला यांनी शेअर मार्केटबरोबर बॉलिवूडमध्येही पैसा गुंतवला होता. राकेश झुनझुनवाला यांनी तीन चित्रपटांची निर्मिती केली होती.
राकेश झुनझुनवाला हे २०१२ मध्ये आलेल्या इंग्लिश-विंग्लिश चित्रपटाचे प्रोड्युसर होते. या सिनेमात श्रीदेवीने मुख्य भूमिका केली होती. या चित्रपटाचं बजेट १० कोटी इतकं होतं.
इंग्लिश-विंग्लिश चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. या चित्रपटाने बजेट दहापट जास्त गल्ला मिळवला होता. तब्बल १०२ कोटी रुपये कमाई या चित्रपटाने केली होती.
इंग्लिश-विंग्लिश चित्रपटानंतर राकेश झुनझुनवालांनी शमिताभ आणि की अॅण्ड का चित्रपट प्रोड्यूस केले होते.
शमिताभ चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासह धनुष्य आणि अक्षरा हासन यांच्या भूमिका साकारल्या होत्या. हा चित्रपट फारसा यशस्वी ठरला नाही.
करीना कपूर आणि अर्जून कपूर यांच्या भूमिका असलेल्या की अॅण्ड का या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. बॉक्स ऑफिस इंडियाच्या माहितीनुसार या चित्रपटाने १०० कोटी रुपये कमाई केली होती.