Rakul preet singh : अभिनेत्री रकुल मागे ED चा फेरा, प्रकरण काय?

मुंबई तक

अभिनेत्री रकुल प्रीत सिंह मागे एका प्रकरणामुळे ईडीचा फेरा लागलाय.

रकुल प्रीत सिंहला ईडीने चौकशीसाठी समन्स बजावलं आहे.

दाक्षिणात्य सिनेमाशी संबंधित लोकांवरील अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात हे समन्स बजावलं आहे.

ईडीने या प्रकरणाशी संबंधित लोकांची चौकशी केलीये. आता रकुल प्रीत सिंहला समन्स बजावलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रकुल प्रीत सिंहला सोमवारीच समन्स बजावलं होतं.