Ramila Latpate: 52 देश, 365 दिवस... पुणेकर रमाबाई बाईकवरून करणार जगभ्रमंती

पंकज खेळकर

पुण्यातील रमिला (रमाबाई) लटपटे मोटरसायकल वरून जगभ्रमंतीला करत आहे.

9 मार्चला निघणार आहे. 365 दिवस प्रवास करून 8 मार्च 2024 रोजी परतणार आहे.

महत्त्वाचं म्हणजे रमिला (रमाबाई) लटपटे नऊवारी साडी नेसून जगभ्रमंती करणार आहे.

जगभ्रमंती मध्ये 6 खंड, 12 G 20 देश आणि एकूण 40 देशातून प्रवास करणार आहे.

महाराष्ट्रातील विविध बचत गटांनी बनवलेले पदार्थ आणि भारतीय संस्कृतीचा प्रसार करणार आहे.

रमाबाई यांनी रायझिंग एबल मॅनकाईंड ऑल राऊंड या जगभ्रमंती मोहिमेचे नियोजन केले आहे.

रमिला 9 मार्च सांयकाळी 4.30 वाजता गेट-वे-ऑफ इंडिया येथून प्रवासाचा सुरू करणार आहे.

काही दिवसांपूर्वी रमिला लटपटे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मोहिमेची माहिती दिली होती.