रणबीर कपूरने आलिया भट्टचा हात ढकलला दूर, धर्मा प्रोडक्शनच्या ऑफिसबाहेर काय घडलं?

मुंबई तक

ब्रह्मास्त्र सिनेमाला मिळालेल्या यशामुळे सगळीकडे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या जोडीची चर्चा होतेय.

आलिया आणि रणबीर लवकरच आईबाबा होणार आहेत. त्यामुळे यंदाचं वर्ष त्यांच्यासाठी धमाकेदार आहे.

आलिया आणि रणबीर यांच्यातील केमिस्ट्रीचे किस्से काही कमी नाहीत. गेल्या काही दिवसात तर दोघांच्या रोमँटिक अंदाजावर चाहते फिदा होत आहेत.

या जोडीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. यात आलिया रणबीरचे विस्कटलेले केस नीट करण्यासाठी पुढे आली आहे.

आलिया आणि रणबीर यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच कमेंटलाही बहार आली आहे.

आलियाने बॅगी जीन्स पँट आणि सैलसर शर्ट घातला आहे. तर रणबीर त्याच्या ब्लू जीन्स आणि व्हाइट टीशर्ट या आवडत्या ड्रेसमध्ये आहे.

गाडीतून उतरल्यानंतर फोटोग्राफर्संना पोझ देण्यासाठी ही जोडी थांबली. आलियाला दिसलं की रणबीरचे केस विस्कटले आहेत. सुरुवातीला आलियाने रणबीरच्या चेहऱ्यावर काहीतरी लागलं होतं ते काढण्यासाठी हात लावला आणि त्यानंतर त्याचे केस नीट करण्यासाठी हात डोक्याकडे पुढे केले.

हे सगळं आलिया सहज करत होती, पण हे सगळं सर्वांसमोर सुरू असल्याने रणबीरला अवघडल्यासारखं झालं. आलिया केस नीट करत असताना त्याने डोकं मागे घेतलं आणि तिचा हात दूर केला. या व्हिडिओने सोशल मीडियावर चांगलच धुमशान केलं आहे.

आलिया भट्ट फोटो/इन्स्टाग्राम