न्यूड फोटोशूटने रणवीर सिंग अडचणीत, मुंबई पोलिसात तक्रार, काय आहे प्रकरण?

मुंबई तक

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने जेव्हापासून न्यूड फोटोशूट केले आहे, तेव्हापासून तो चर्चेत आहे.

आधी फोटो व्हायरल झाले, मग मीम्स झाले, रणवीरची पत्नी दीपिका पदुकोणची प्रतिक्रिया आली, सेलिब्रिटींनी मतं मांडली.

आता रणवीर सिंगविरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे.

पोलिसांना मिळालेल्या या तक्रारीत रणवीर सिंगवर 'महिलांच्या भावना दुखावल्याचा' आरोप आहे.

रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटचे फोटो समोर आल्यापासून तो वादात सापडला आहे. हे फोटोशूट व्हायरल झाल्यानंतर त्यावरून राजकारणही सुरू झाले आहे.

रणवीर सिंगच्या न्यूड फोटोंवर एकामागून एक सेलिब्रिटींच्या प्रतिक्रियाही येत आहेत. अर्जुन कपूर, दीपिका पदुकोण आणि पूनम पांडे यांच्यानंतर आता आलिया भट्टही यावर बोलली आहे.

'डार्लिंग्स' चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी आलियाला तिचे मत विचारण्यात आले. यावर तिने सांगितले की, ती तिच्या आवडत्या अभिनेत्याबद्दल असे काहीही ऐकू इच्छित नाही.

रणवीर सिंगलाही त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे ट्रोलर्सचा सामना करावा लागला आहे. या फोचोशूटने युजर्सनी रणवीरची खिल्ली उडवली आहे.