Matrimonial साईटवर झाली ओळख... अन् पुढे नको तेचं झालं!

मुंबई तक

नागपूरच्या पाचपावली पोलीस ठाण्यांतर्गत बलात्काराची घटना उघडकीस आली आहे.

आरोपी सुशील भांभोडेने Jeevansathi.com या मॅट्रिमोनियल साईटवर आधी मुलीशी मैत्री केली.

काही दिवसांतच त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले अन् सुशीलने लग्नाच्या बहाण्याने पीडितेशी जबरदस्ती शारिरीक संबंध ठेवले.

पिडीतेने लग्नासाठी दबाव टाकला, पण आरोपी सुशीलने लग्नास नकार दिला.

फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पीडित मुलीने गुन्हा दाखल करून आरोपी सुशीलविरुद्ध बलात्कारासह इतर कलमांखाली तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, आरोपी सुशील फरार झाला असून पोलीस या प्रकरणात त्याचा शोध घेत आहेत.