मुंबई तक
देशातील सर्वात नामवंत उद्योजक रतन टाटा एका सुंदर आणि अलिशान घरात राहतात.
त्यांचे भारतातील दानवीरांच्या यादीतही सर्वोच्च स्थान आहे. त्यांनी जितकं कमवलं आहे तितकचं लोकांना दिलं देखील आहे.
त्यांचे हे अलिशान घर कोणीही पाहिले तर ती व्यक्ती देखील नक्कीच थक्क होईल.
टाटांचे मुंबईतील कुलाबा या ठिकाणी एक अलिशान घर आहे जिथे ते राहतात.
खरं, तर हा एक मोठा बंगला आहे. ज्याची किंमत जवळजवळ दीडशे कोटी रूपयांहून अधिक आहे.
या अलिशान बंगल्यात सर्व सुखसोयी-सुविधा आहेत. जसं की, जीम, स्वीमिंग पूल, सन डेक, बार, लाऊंज असं बरचसं...
रतन टाटांच्या या घराला सिंपल आणि सोबर लूक येईल असं डिझाइन करण्यात आलं आहे.
रतन टाटा संपत्तीने कितीही मोठे असले तरी, मनाने ते अगदी सरळ आणि साधे आहेत. त्यांचा हाच स्वभाव सर्वांना आवडतो.