मुंबई तक
रतन टाटांचा नुकताच वाढदिवस झाला. आता त्यांनी वयाची 78 वर्ष त्यांनी पूर्ण केले आहेत.
वाढदिवसादिवशी टाटांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 78 वर्षांपूर्वीचा एक फोटो शेअर केला.
जुन्या आठवणींना उजाळा देत टाटांनी फोटो शेअर केला आणि एक भावनिक मेसेज लिहिला.
या फोटोमध्ये रतन टाटा त्यांचा भाऊ जिम्मी नवल टाटा आणि त्यांच्या एका पाळीव कुत्र्यासोबत दिसत आहेत. त्यावेळी ते 8 वर्षांचे होते.
भावूक झालेले टाटा फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहितात की, '1945 मध्ये हा फोटो काढला आहे.'
'ते आनंदाचे दिवस होते... आमच्यात त्यावेळी काहीही आलेलं नव्हतं" टाटांनी असा भावनिक मेसेज लिहिला आहे.
साधेपणामुळे चर्चेत असणाऱ्या टाटांना कुत्र्यांप्रती जिव्हाळा आणि प्रेम आहे.
टाटा आज यशाच्या शिखरावर आहेत परंतु, त्यांचा साधेपणा आणि उदारता हाच स्वभाव लोकांना आवडतो.