सेंकड हॅण्ड कार घेण्यापूर्वी हे वाचा; मोदी सरकारने बदलले नियम

मुंबई तक

चोरीच्या वाहनांची फसवणूक आणि खरेदी-विक्रीला आळा घालण्यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालयाने आता मोठे पाऊल उचलले आहे.

All Photo Source Google

नवीन नियमामुळे योग्य डीलर आणि वाहन ओळखणे सोपे होणार आहे

केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 च्या चॅप्टर III मध्ये रस्ते वाहतूक मंत्रालयाने बदल केले आहेत. हा बदल 1 एप्रिल 2023 पासून लागू होईल.

नियमातील बदलाबाबत सांगितले जात आहे की, यामुळे सर्वसामान्यांना अनेक फायदे होतील.

सेकंड हँड वाहन खरेदी आणि विक्रीमध्ये गुंतलेल्या डीलरची पडताळणी करण्यासाठी प्रमाणपत्र जारी केले जाईल जेणेकरुन लोकांना कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून वाचवता येईल.

वाहनाचे मायलेज, ड्राईव्ह, वापर यासंबंधीचे सर्व तपशील तपासता येतील. वाहनाशी संबंधित कोणत्याही प्रकारचे नुकसान किंवा कागदपत्रांचे नुकसान झाल्याची माहिती मालकाला प्राधिकरणाला कळवावी लागेल.