मुंबई तक
भारतीय संघातील यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत सध्या अपघातातून सावरत आहे.
ऋषभ पंतने त्याच्या कार अपघातानंतर दोन महिन्यांनी पहिल्यांदा मनमोकळं केलं.
टीम इंडियात पुनरागमन करण्याच्या त्याच्या आशेबद्दलही तो बोलला आहे.
ऋषभ पंत म्हणाला, 'या अपघातानंतर मला जीवन जगण्याचा खरा अर्थ समजला. आज मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहे.'
'आपण मोठी स्वप्ने पूर्ण करण्यात व्यस्त असतो पण आयुष्यातील छोट्या-छोट्या गोष्टींमध्येही सुख असतं.'
'अपघातानंतर स्वत:ला ब्रश करणे, उन्हात बसणे यातही आनंद होतो. या अपघातानंतर माझ्या आयुष्यात खूप बदल झाले आहेत', असं पुढे पंत म्हणाला.
'मी क्रिकेटला किती मिस करत आहे, हे सांगणे माझ्यासाठी कठीण आहे कारण माझे आयुष्य त्याभोवती फिरत आहे.'
'मी पुन्हा क्रिकेट कधी खेळणार आहे, याची मी वाट पाहू शकत नाही', ऋषभ पंतने हे भावूक वक्तव्य केलं.