Rishabh Pant : ऋषभ वनडे वर्ल्ड कपमधून राहणार बाहेर? तब्येतीबद्दल मोठी अपडेट

मुंबई तक

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या तब्येतीकडे बीसीसीआयची नजर आहे.

ऋषभ पंत सध्या मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार घेत आहे.

ऋषभ पंतची लिगामेंट रिकंस्ट्रक्शन सर्जरी झाली आहे, पण अजूनही उपचार बाकी आहेत.

ऋषभ पंतवर पुढील आठवड्यात आणखी एक सर्जरी होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे ऋषभ आयपीएल आणि आशिया कपबरोबरच वर्ल्ड कपमध्येही खेळू शकण्याची शक्यता धूसर होताना दिसत आहे.

एकदिवसीय वर्ल्ड कप संघातून ऋषभ पंत बाहेर राहू शकतो, कारण तोपर्यंत तो फीट होण्याची शक्यता कमी आहे.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानेच याबद्दलची माहिती दिलीये.

बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, 'ऋषभ पंत वर्ल्ड कप पर्यंत फीट होण्याची शक्यता खूपच कमी आहे.'