रितेश-जिनिलीयाच्या ‘वेड’ची जादू; रेकॉर्ड ब्रेकिंग कमाईने सैराटलाही टाकलं मागे

मुंबई तक

अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलीया यांच्या ‘वेड’ चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला वेडं लावलं आहे. 

प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच हा चित्रपट कोटींची कमाई करत आहे.

आता चित्रपट प्रदर्शित होऊन दहा दिवस झाल्यानंतरही बॉक्स ऑफिसवर ‘वेड’चा बोलबाला कायम आहे.

‘वेड’ चित्रपटाने पहिल्या आठवड्यात २०.६७ कोटींचा गल्ला जमवला.

प्रदर्शनाच्या दहाव्या दिवशीही ‘वेड’ची यशस्वी घौडदोड सुरुच आहे.

वेड चित्रपटाने दहाव्या दिवशी तब्बल ५.७० कोटींची कमाई करत सैराटलाही मागे टाकलं आहे.