रितेशने मोडला स्वतःचा रेकॉर्ड... 'लय भारी' ला 'वेड'सारखी तोड!

मुंबई तक

अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांचा 'वेड' सिनेमा रोज नवे रेकॉर्ड ब्रेक करत आहे.

'वेड' सिनेमाच्या कमाईमध्ये दिवसेंदिवस मोठी वाढ होते आहे.

गेल्या रविवारी 'वेड'ने ५.७० कोटींची कमाई करत 'सैराट'ने एका दिवसात केलेल्या सर्वाधिक कमाईचा रेकॉर्ड मोडला होता.

त्यानंतर सोमवारी २.३५ कोटींचा गल्ला जमवत 'वेड'ने रितेशच्याच 'लय भारी' चा रेकॉर्ड ब्रेक केला.

सोमवारी अकराव्या दिवशी २.३५ कोटींचा गल्ला जमवल्यानंतर 'वेड'ची एकूण कमाई ३५.७७ कोटी झाली आहे.

ही बॉक्स ऑफिसवरील कमाई 'लय भारी' या सिनेमाच्या एकूण कमाईपेक्षा जास्त आहे.