Rohit Sharma : रोहितने मोडला एबी डिव्हिलियर्सचा विक्रम

मुंबई तक

Ind vs Sl तीसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा त्याच्या खेळीमुळे चर्चेत आला.

कर्णधार रोहित शर्माने वनडे सामन्यात एक मोठा विक्रम आपल्या नावे केला.

वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांच्या बाबतीत रोहितने एबी डिव्हिलियर्सला मागे टाकलं.

रोहित शर्मा वनडे सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत 17व्या स्थानी पोहोचला.

चांगल्या सुरुवातीनंतरही रोहित शर्मा यावेळी मोठी खेळी करू शकला नाही.

रोहित शर्मा 42 धावांवर बाद झाला. त्याने 49 चेंडू खेळताना 2 चौकार आणि 3 षटकार लगावले.

वनडे मालिकेतील ही दुसरी वेळ आहे की रोहित शर्मा जास्त काळ मैदानावर राहिला नाही.