Rohit Sharma : रोहितचं वेड! लाईव्ह मॅचमध्ये मैदानात आला छोटा चाहता... पुढे काय झालं?

मुंबई तक

भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना रायपूरमध्ये झाला.

टीम इंडियाने 8 गडी राखून दुसरा सामना जिंकला अन् मालिकेत 2-0 आघाडी घेतली.

रोहित शर्माने या सामन्यात कर्णधारपदाला साजेशी खेळी करत 51 धावा काढल्या.

रोहित शर्मा शर्मा खेळत असताना एक घटना घडली, तिची सोशल मीडियावर खूप चर्चा होतेय.

Ind vs NZ दुसऱ्या सामन्यात रोहित फलंदाजी करत असताना एक छोटा चाहता मैदानात शिरला.

या छोट्या चाहत्याने सुरक्षा रक्षकांची साखळी तोडून रोहित शर्माला मिठी मारली.

रोहित शर्माबद्दलचं वेड या छोट्या चाहत्यानं त्याला मिठी मारून व्यक्त केलं.

रोहितला पाहताच चाहता रडू लागला होता, नंतर रोहितने जवळ जाऊन प्रेमाने त्याचे गाल ओढले.

छोटा चाहता मैदानात शिरताच सुरक्षा कर्मचारीही त्याच्या पाठी आले. मात्र, रोहितने त्याला शिक्षा न करण्याचं सांगितलं.