मुंबई तक
दारू पिण्याबद्दल अनेक प्रकारचे दावे केले जातात, जे लोकं सत्य म्हणून स्वीकारतात.
सध्या कडाक्याची थंडी आहे अशावेळी अनेक जण रम पिण्याचा सल्ला देतात.
पण खरोखरच हिवाळ्यात रमचं सेवन केलं पाहिजे का? जाणून घ्या या दाव्याबाबत वाइन तज्ज्ञांचे मत काय आहे
भारतात प्रामुख्याने दोन प्रकारची रम उपलब्ध आहे. एक पांढरी रम आणि दुसरी डार्क रम. रम तयार करण्यासाठी मोलॅसिसचा वापरलं जातं.
या मोलॅसिसमध्ये भरपूर कॅलरीज असतात. डार्क रम तयार करताना त्यात आणखी मोलॅसिस टाकून स्वतंत्रपणे प्रक्रिया करतात.
रमला विशेष गडद रंग आणि चव देण्यासाठी वापर केला जातो. या अतिरिक्त मोलासेसमुळेच डार्क रममध्ये अतिरिक्त कॅलरीज असतात.
या अतिरिक्त कॅलरीजमुळे, हिवाळ्यात रमचे सेवन केल्याने उबदार वाटते. तज्ज्ञांच्या मते उन्हाळ्यात रम पिऊ नये या दाव्यात अजिबात तथ्य नाही.