Girlfriend साठी धाडसं केलं अन् थेट बॉम्बच्या अफवेनं विमान थांबवलं!

मुंबई तक

पुण्याला जाणाऱ्या गर्लफ्रेंडला थांबवण्यासाठी एका प्रेमवीराने चक्क विमान थांबवलं. तेही बॉम्बची अफवा पसरवून.

दिल्ली ते पुणे या स्पाईसजेटच्या विमानाने गुरुवारी संध्याकाळी एका तरुणाची गर्लफ्रेंड प्रवास करणार होती.

अशातच या विमानात बॉम्ब असल्याची अफवा पसरवण्यात आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. 

सुरक्षा यंत्रणांनी कसून तपास केल्यानंतर अफवा असल्याचं निष्पन्न झालं.

दरम्यान, हे कृत पुण्याला जाणाऱ्या गर्लफ्रेंडला रोखण्यासाठी केलं असल्याचं समोर आलं.

पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून प्रकरणाचा खुलासा झाला.