मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर सुसाट कार जळून खाक!

मुंबई तक

मुंबई नागपूर हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर पुन्हा दुर्घटना घडलीये.

समृद्धी महामार्गावर एका धावत्या कारने पेट घेतला.

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्याच्या हद्दीतील गलांडे वस्तीजवळ ही दुर्घटना घडलीये.

भरधाव कार समृद्धी महामार्गावरून शिर्डी मार्गे पुण्याला जात असताना ही घटना घडली.

कारने पेट घेतला. त्यानंतर आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली.