Bhagat Singh Koshyari: "...अशी मोदी सरकार व भाजपची भावना दिसते"

मुंबई तक

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्त करण्याची मागणी केलीये. या मुद्द्यावरून काँग्रेसचे सचिन सावंत यांनी भाजपवर टीका केलीये.

"राज्यपालांनी थोर महापुरुषांच्या सातत्याने केलेला अवमानामुळे महाराष्ट्रातून एकमुखाने केल्या गेलेल्या त्यांना हटविण्याच्या मागणीवर भाजपा नेते केंद्राकडे बोट दाखवत राहिले."

"आता राज्यपाल सातत्याने पदमुक्त करण्याची मागणी करत आहेत."

"तरीही त्यांना पदावरून हटवले जात नाही ‌याचा अर्थ महाराष्ट्राच्या जनतेच्या नाकावर टिच्चून आम्ही त्यांना तिथेच ठेवणार अशी मोदी सरकार व भाजपाची भावना दिसते."

"महापुरुषांचा अनादर भाजपाच्या निर्देशानुसार केला गेला होता का? मोदी सरकारला महाराष्ट्राचा इतका आकस का? जाहीर निषेध!", असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.