मुंबई तक
अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर खान काल (2 मार्च) रात्री मलायका अरोराच्या आईच्या बर्थडे पार्टीला गेले होते.
पार्टीवरून परतताना मीडिया आणि कॅमेरामन्सने सारखं पाठलाग करणं सैफ अली खानला अजिबात आवडलं नाही.
ते सैफ-करीनाला फोटोसाठी वारंवार विनवणी करत होते. त्यावर सैफ रागात म्हणाला, 'आता आमच्या बेडरूममध्येच या.'
सैफचं हे बोलणं ऐकूण काही कॅमेरामन हे त्याला सॉरी बोलले तर, काही म्हणाले सर आम्ही तुमच्यावर प्रेम करतो.
सैफही त्यांना उत्तर देत म्हणाला आम्हीही तुमच्यावर प्रेम करतो. सध्या हा व्हिडीओ व्हायरल होतोय.
जेव्हा सैफ बेडरूममध्ये या असं म्हणाला तेव्हा करीना हसताना दिसली.
सध्या त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे काहींना सैफचं हे वागणं पटलेलं नाहीये.