Samantha Ruth Prabhu : फीट राहण्यासाठी सामंथा पिते टोमॅटोची स्मुदी, कशी बनवायची?

मुंबई तक

दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू अभिनयाबरोबरच फिटनेससाठीही प्रसिद्ध आहे.

सामंथा रुथ प्रभू आणि तिच्या टोन्ड फिगरवर फिदा असणारे अनेक चाहते आहेत.

सामंथा रुथ प्रभू एक्सरसाईज, डाएट, झोप या सगळ्या गोष्टी दररोज पाळते.

सामंथा रूथ प्रभू तिच्या डाएट प्लानमध्ये खास टोमॅटोची स्मुदी घेते.

सामंथा रुथ प्रभूची टोमॅटो स्मुदी, ऑलिव्ह ऑईल, नारळाचं पाणी आणि तुळशीच्या पानांपासून बनवलेली असते.

सामंथा रुथ प्रभूने तिच्या इन्स्टाग्रामवरही या स्मुदीबद्दल माहिती दिली होती.

टोमॅटो एंटीऑक्सिडंटचा मुख्य स्त्रोत असून, त्यात लाइकोपाइन जास्त असतं. त्यामुळे ह्रदयाचे आजार, कॅन्सर आदींचा धोका कमी होतो.

नारळाचं पाणी ब्लड शुगर कमी करतं आणि किडनी स्टोनही दूर ठेवतं.

स्मुदी बनवण्यासाठी 2 टोमॅटो, 4 ते 6 तुळशीची पानं, 1 कप नारळाचं पाणी, अर्धा चमचा काळी मिरी, 1 चमचा ऑलिव्ह ऑईल आणि मीठ आदी गोष्टी लागतात.