खिशातच मोबाईलमधून धूर येऊ लागला, अन्... : Samsung च्या मोबाईची काय झाली अवस्था?

मुंबई तक

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात भाऊराव आस्वले पँटच्या खिशात असलेल्या मोबाईलमधून अचानक धूर येऊ लागला.

हाताला गरम वाटू लागल्याने भाऊराव आस्वले यांनी मोबाईल बाहेर काढताच आग पकडल्याने त्यांनी तो फेकून दिल्यावर अचानक स्फोट झाला.

सॅमसंग कंपनीचा हा मोबाईल भाऊराव आस्वले यांनी चार वर्षांपूर्वी खरेदी केला होता.

या घटनेत धूर व आगीमुळे आस्वले यांची पॅन्ट जळून मांडीला ईजा झाली आहे.

मोबाईल गरम होत झालेल्या स्फोटामागे नेमके कारण काय याबाबत प्रश्नचिन्ह  निर्माण झाले आहे.

अचानक झालेल्या या प्रकाराने भाऊराव अस्वले यांना धक्का बसलाय.