'मरायचं असेल तर मरेन, पण...', संजय दत्तने सांगितला वेदनादायी अनुभव

मुंबई तक

कर्करोगावर मात करून पुन्हा चांगलं आयुष्य जगणाऱ्यांपैकी एक म्हणजे अभिनेता संजय दत्त.

संजूबाबा जसा रील आयुष्यात आहे, तसाच रिअल आयुष्यातही बिनधास्त आहे.

संजय दत्तच्या बॉलिवूड चित्रपटातील अनेक भूमिका गाजल्या. त्यांचा अभिनयही प्रेक्षकांना भावतो.

अनेक भूमिका लिलया पेलणाऱ्या संजय दत्तवर अचानक आघात झाला, तो कर्करोगाचा.

संजय दत्तला 2020 मध्ये स्टेज 4 चा फुफ्फुसाच्या कर्करोगाचं निदान झालं होतं.

कर्करोगावरील उपचार घेताना संजय दत्तला प्रचंड त्रासातून जावं लागलं.

माझ्यासोबत पत्नी, कुटुंब, बहीण कुणीही नव्हतं. त्यावेळी एका व्यक्तीनं सांगितलं की, कॅन्सर झालाय.'

'त्यावेळी एक बोललो होतो की, मला केमोथेरपी उपचार घ्यायचे नाही.'

'जर मला मरायचं असेल, तर मरेन, पण ट्रीटमेंट घेणार', असा अनुभव संजय दत्तने यावेळी सांगितला.