राणे-राऊतांमध्ये ज्यामुळे ठिणगी पडलीये, 'त्या' अग्रलेखात काय?

मुंबई तक

नारायण राणे म्हणाले, "26 डिसेंबरचा अग्रलेख राखून ठेवलाय, संजय राऊतांना सोडणार नाही."

राऊतांनीही थेट सरन्यायाधीशांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला आणि वाद शिलगला.

आणि त्यामुळेच 26 डिसेंबरचा अग्रलेखात काय होतं हाही मुद्दा चर्चेत आला.

26 डिसेंबरच्या अग्रलेखात काय म्हटलेलं आहे पुढच्या स्लाईडवर वाचा.

"नागपूर भूखंड प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एखादी ‘एसआयटी’ नेमली असती तर फडणवीस यांचे चरित्र उजळून निघाले असते."

"पण गाडलेले विषय उकरून त्याबाबत ‘एसआयटी’ वगैरे निर्माण केल्या जात आहेत."

"आमदार महेश शिंदे म्हणताहेत, ‘‘आम्ही खोके घेतले.’’ मग हा चौकशीचा विषय ठरू नये? आश्चर्यच आहे."

"सिंधुदुर्गात रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकुश राणेंचा खून पचवणारे दुसऱ्यांकडे बोट दाखवतात."

"या तिन्ही खुनांच्या तपासासाठी फडणवीस एखादी एसआयटी नेमणार असतील तर..."

"...कोकणातले 100 सांगाडे 'पुरावे' म्हणून त्या एसआयटीसमोर स्वतःच हजर होतील, पण फडणवीस ते करणार नाहीत."