Sara Tendulkar : 'ही तर फक्त सुरुवात आहे', सचिनच्या लेकीची भावासाठी पोस्ट

मुंबई तक

क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जून तेंडुलकरने रणजी स्पर्धेत केलेल्या खेळीचं कौतूक होतंय.

गोवा संघाकडून खेळताना अर्जून तेंडुलकरने राजस्थानविरुद्ध शतकी खेळी केली.

अर्जून तेंडुलकरचं या खेळीबद्दल कौतूक होतंय. सारा तेंडुलकरनेही खास पोस्ट शेअर केलीये.

सारा तेंडुलकरने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत तिचा आनंद व्यक्त केला.

'तुझी कठोर मेहनत आणि संयम आता हळू हळू रंग भरू लागली आहे', असं साराने म्हटलंय.

सारा तेंडुलकरने अर्जून तेंडुलकरचा फोटोही पोस्ट केला आहे.