Satara : लाखो भाविकांच्या साक्षीने श्री. खंडोबा म्हाळसा विवाह सोहळा संपन्न...

इम्तियाज मुजावर

पाल नगरीत खंडोबा व म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळा पाहण्यासाठी अथांग जनसागर लोटला होता.

यावेळी भंडारा खोबऱ्याच्या उधळणीने पालनगरी पिवळी धमक झाली होती.

मिरवणूक तारळी नदीपात्रात येताच लाखो भाविकांनी भंडारा खोबऱ्याची उधळण करीत खंडोबा म्हाळसा यांचा जय जयकार केला.

मुख्य मिरवणूक तारळी नदीपत्रातून मारुती मंदिर मार्गे बोहल्याजवळ आली. यावेळी येळकोट येळकोट जय मल्हार... जयजयकाराने परिसर दुमदुमून गेला.

देव मंडपात आल्यानंतर मानकरी देवराज पाटील यांनी देवास बोहल्यावर चढविले

यानंतर पारंपारिक पद्धतीने लाखो भाविकांच्या साक्षीने श्री खंडोबा व म्हाळसा यांचा विवाह सोहळा गोरज मुहूर्तावर मोठ्या थाटात संपन्न झाला.