मुंबई तक
लहान मुला-मुलांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वेशभुषेत आज रैली काढली.
वाशिममधील कामरगाव येथील कॉन्वेंटच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे संदेश फलक हातात घेऊन सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केलं.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षण प्रसार आणि समाज सुधारणेच्या कामासाठा वाहुन घेतलं होतं.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच प्रतिभा पाटील राष्ट्रपती होऊ शकल्या, कल्पना चावला अंतराळवीर आणि वैज्ञानिक होऊ शकल्या.
सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी 01 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली होती.
स्त्री शिक्षणासोबतच विधवांची परिस्थिती सुधारावी म्हणून सावित्रीबाई फुले यांनी ज्योतिबा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले.