Google वर 'या' गोष्टी सर्च करताच तुमचं बँक अकांउट होईल खाली!

रोहित गोळे

तुम्हीही गुगल सर्चवर जास्त अवलंबून आहात का? तसं असेल तर आताच यातील धोका ओळखा.

google

कारण सर्चची ही सवय तुम्हाला अडचणीत आणू शकते. अशी अनेक प्रकरणे आतापर्यंत उघडकीस आले आहेत.

google

खरं तर, स्कॅमर Google वर जातात आणि कस्टमर केअर नंबर एडिट करतात.

google

यामुळे तुम्ही गुगलवर नंबर सर्च केल्यावर तुम्हाला स्कॅमरचा नंबर मिळेल. तुम्ही कॉल करता तेव्हा स्कॅमर तुमची फसवणूक करतात.

google

जेव्हा तुम्ही गुगलवर एखादं दुकान किंवा ऑफिसचा नंबर शोधता तेव्हा तुम्हाला अनेक तपशील दिसतात. हेच नंबर स्कॅमर एडिट करतात.

google

म्हणून तुम्हाला हवा असलेला एखादा नंबर हा नेहमी अधिकृत वेबसाइटवरून मिळवावा. कारण गुगलवरील सर्व माहिती बरोबरच असेल असे नाही.

google