अनंत अंबानी-राधिकाचा साखरपुडा, खास फोटो आले समोर

मुंबई तक

मुकेश अंबानींच्या कुटुंबात पुन्हा एकदा सनई-चौघडे वाजणार आहेत. कारण आता त्यांच्या घरी धाकटी सून येणार आहे.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा 'रोका' (साखरपुडा) सोहळा गुरुवारी अगदी खास लोकांच्या उपस्थितीत पार पडला.

राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यातील नाथद्वारा श्रीनाथजी मंदिरात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

रोका सोहळ्यात अंबानी आणि राधिकाच्या कुटुंबियांशिवाय त्यांचे खास मित्रही सहभागी झाले होते.

मुकेश अंबानी यांच्या धाकट्या मुलाच्या रोका कार्यक्रमासाठी मंदिरात खास सजावट करण्यात आली होती.

अनंत अंबानी मंदिरात पोहोचल्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करून त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.

श्रीनाथजींचा आशीर्वाद घेऊन या तरुण जोडप्याने आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.

मंदिराच्या आवारातील या जोडप्याचे अतिशय सुंदर फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.