मुंबई तक
बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुखचा Pathan चित्रपट वादामुळे जास्तच प्रसिद्धीच्या झोतात आला.
शाहरुखचा पठाण चित्रपट लवकरच म्हणजे 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.
चित्रपट प्रदर्शनापूर्वीच शाहरुखच्या चाहत्यांनी बुकिंगसाठी गर्दी केलेली आहे.
सांगलीच्या एका पठ्ठ्यानं, तर कमालच केली आहे. त्याचे प्रेम पाहून स्वत: शाहरूखने त्याला रिप्लाय केला.
पठाण पाहण्यासाठी सांगलीच्या एसआरके युनिव्हर्स या फॅन क्लबनं संपूर्ण थिएटरच बुक केलं आहे.
SRK वासिम या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्विट शेअर करण्यात आलं आहे.
ट्विटमध्ये काही मुलं हातात पठाण चित्रपटाची तिकिटं घेऊन पठाणच्या पोस्टरसमोर उभी आहेत
ट्विटला देण्यात आलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, "सर, प्लिज हे पाहा, आम्ही पूर्ण ऑडिटोरियम बुक केलं आहे."
या ट्विटवर शाहरुख म्हणाला, "थँक्यू आणि तुम्हाला हा चित्रपट आवडेल, अशी आशा बाळगतो."