शरद पवारांनी सांगितलं ठाकरेंच्या शिवसेनेचं भवितव्य

मुंबई तक

'ठाकरेंच्या शिवसेनेच्या राजकीय भवितव्याबद्दल काय वाटतं?', असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला.

या प्रश्नावर पवार म्हणाले, "मी महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात गेलोय, जातोय. अगदी कोल्हापूर."

"माझी माहिती अशी आहे की, शिवसेनेत गट पडले ही गोष्ट खरी आहे; पण शिवसैनिक जो कडवा कार्यकर्ता आहे."

"जमिनीवर काम करणारा, हा बहुसंख्य उद्धव ठाकरेंच्या बरोबर आहे."

"याला कोल्हापूर सुद्धा अपवाद नाहीये. कदाचित काही आमदार, नेते, खासदार इकडून तिकडे गेले असतील..."

"...पण उद्या निवडणुका होईल, त्यावेळी जनतेच्या भावना काय आहेत, हे त्यांच्या लक्षात येईल", असं भाष्य पवारांनी केलं.