Tunisha Sharma : "शीजानकडून मारहाण, बुरखा घालण्यासाठी तुनिषावर दबाव"

मुंबई तक

वयाच्या अवघ्या 24 वर्षी टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने आयुष्य संपवलं.

24 डिसेंबर 2022 रोजी तुनिषा शर्माने सेटवरील मेकअप रुममध्येच आत्महत्या केली.

तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर तिचा एक्स बॉयफ्रेंड शीजान मोहम्मद खानला अटक झालीये.

तुनिषाच्या आईने शीजान खानवर गंभीर आरोप केले आहेत.

तुनिषाच्या आईने पत्रकार परिषदेत सांगितलं की, 'सेटवर मी शीजानला समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याने ऐकलं नाही.'

'तुनिषाने आत्महत्या केली त्यांच्या एक दिवस आधी मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला', असं तुनिषाच्या आईने म्हटलंय.

'ख्रिसमससाठी चंदीगढला जाण्याचा तुनिषाचा विचार होता. कदाचित ही हत्या असू शकते. कारण दरवाजा उघडल्यानंतर 15 मिनिटं कोणतीही कार नव्हती'

'शीजान खान तुनिषावर बुरखा घालण्यासाठी दबाव टाकत होता. शीजानने ब्रेकअपच्या दिवशी तिला मारलं होतं,' असा आरोप तुनिषाच्या आईने केला आहे.