शहनाज गिलला काय झालं? चिखलातील फोटो बघून तुम्हालाही पडेल प्रश्न

मुंबई तक

बिग बॉस १३ फेम अभिनेत्री शहनाज कौर गिलची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही.

शहनाज गिलचे कोट्यवधी चाहते असून, तिचा निखळ स्वभाव अनेकांना भावतो. नेहमी वेगवेगळ्या मुद्द्यांमुळे चर्चेत राहणाऱ्या शहनाज गिलने आता नवीन फोटो शेअर केले आहेत.

शहनाज गिलने शेअर केलेले फोटो बघून तिला काय झालंय, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला.

या फोटोमध्ये शहनाज गिल पूर्णपणे चिखलाने माखलेली आहे. ती चिखलातच झोपलेली दिसत आहे.

शहनाज गिलने ब्लॅक शॉर्ट्स आणि टी-शर्ट घातलेला असून, वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे.

पावसाळ्यात सगळेच चिखलात जायचं टाळतात, अशा वेळी शहनाज गिलने हे फोटो शेअर केल्यानं अनेकांना प्रश्न पडलाय.

शहनाज गिलने हे फोटो शेअर करताना कॅप्शन मध्ये स्पा टाइम असं म्हटलं आहे.

शहनाज गिलने शेअर केलेल्या या फोटोंवर तिचे चाहते कमेंट्स करत आहेत.

बिग बॉस १३ फेम शहनाज कौर गिलला पंजाबची कतरिना कैफ असंही म्हटलं जातं.

शहनाज गिल फोटो इन्स्टाग्राम