Sai Baba : नाताळ, नववर्षांत शिर्डीमध्ये भक्तांची रीघ; साईंच्या चरणी कोट्यावधी रुपये दान

मुंबई तक

२५ डिसेंबर २०२२ ते २ जानेवारी २०२३ या ९ दिवसात सुमारे ८ लाख भक्‍तांनी श्री. साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.

नाताळ, चालू वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्‍वागत यानिमित्‍त शिर्डी महोत्‍सव आयोजित करण्यात आला होता.

या काळात देश विदेशातुन १७.८१ कोटी रुपये देणगी प्राप्‍त झाल्याची माहिती संस्‍थानचे प्र. मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी दिली.

यात दानपेटी, देणगी स्वरुपात, डेबिट/क्रेडिट कार्डद्वारे, ऑनलाईन स्वरुपात, चेक-डीडी, मनी ऑर्डर, सोने-चांदी अशा विविध स्वरुपात जमा झालेल्या देणगीचा समावेश आहे.

तसंच ऑनलाईन आणि सशुल्‍क दर्शन/आरती पास यामाध्यमातून ०१ लाख ९१ हजार १३५ साईभक्‍तांकडून ०४ कोटी ०५ लाख १२ हजार ५४२ रुपये प्राप्‍त झालेले आहे.

लाडू प्रसाद पाकिटांच्या विक्रीतून ०१ कोटी ३२ लाख १९ हजार २०० रुपये प्राप्‍त झालेले आहेत.

३१ डिसेंबर २०२२ व ०१ जानेवारी २०२३ या याकालावधीत १७१ साईभक्‍तांनी रक्‍तदान केलेले आहे.