रोहित गोळे
भारतीय लष्कराच्या महिला अधिकारी कॅप्टन शिवा चौहान यांना जगातील सर्वात उंच युद्धभूमी सियाचीन ग्लेशियरवर तैनात केलं आहे.
कॅप्टन शिवा कुमार चौकीवर तैनात आहेत. भारतीय लष्कराने पहिल्यांदाच या धोकादायक पोस्टवर महिला अधिकाऱ्याची नियुक्ती केलीए.
शिवा कुमार या पदावर नियुक्त झालेल्या पहिल्या भारतीय महिला आहेत.
सध्या सियाचीनमध्ये दिवसाचे तापमान -21 अंश सेल्सिअस आहे. तर रात्री -32 अंश सेल्सिअस तापमान असतं.
अशा स्थितीत आपले शूर सैनिक हवामानाशी लढताना सीमेचे रक्षण करण्यात गुंतलेले आहेत.
1984 ते 2015 पर्यंत केवळ खराब हवामानामुळे 873 भारतीय जवानांनी आपला जीव गमवाला आहे.
सियाचीन ग्लेशियरवर 3 हजार सैनिक नेहमीच तैनात असतात.