मुंबई तक
शिवसेना (UBT) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज ज्युनियर-सिनियर केजीच्या वर्गाच्या नूतनीकरणाचं उद्घाटन झालं.
अंधेरी पूर्व येथील गुंदवली शाळेतील या वर्गांच्या नूतनीकरणाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार ऋतुजा लटकेही उपस्थित होत्या.
यावेळी आदित्य ठाकरे यांनी लहान मुलांच्या सोबत गप्पा गोष्टी केल्या.
आदित्य ठाकरे बराच वेळ या लहान मुलांच्या रमलेले पाहायला मिळाले.
मुलांनीही आदित्य ठाकरेंशी बऱ्याच गप्पा मारल्या.
यावेळी आदित्य ठाकरे यांनी उपस्थित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्याशी सेल्फीही घेतली.