मुंबई तक
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 97 वी जयंती.
जयंतीदिनी राजकारणासह विविध क्षेत्रातील दिग्गज, मान्यवर यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली.
बाळासाहेबांसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला जात आहे.
बाळासाहेबांसोबत घालवलेला वेळ, त्यांनी केलेलं मार्गदर्शन याबद्दल भरभरुन बोललं जात आहे.
बाळासाहेब ठाकरे नेहमीच आपली बोलण्यावागण्याची राजेशाही शैली राखून असत.
आपल्या काम करण्याच्या खास पद्धतीमुळे त्यांना राष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठा मिळालेली होती.
मराठी माणूस आणि अनेक तरूण त्यांच्याकडे चुंबकासारखे आकर्षित झाले होते.