ganeshotsav 2022 : श्रद्धा कपूरच्या घरी बाप्पा आले, अभिनेत्री म्हणाली...

मुंबई तक

अभिनेत्री श्रद्धा कपूर गणरायाची भक्त तर आहे, त्याचबरोबर ती दरवर्षी गणेशोत्सवाची आतुरतेनं वाट बघत असते.

गणेशोत्सव आला की, श्रद्धा कपूर कामातून ब्रेक घेतेच.

चित्रीकरणातून ब्रेक घेऊन श्रद्धा कपूर गणेशोत्सावाचा आनंद घेते. यंदाही श्रद्धानं गणेशोत्सव सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत.

छान नऊवारी साडी नेसून तिनं गणरायाचं स्वागत केलंय.

गणरायाची प्रतिष्ठापना झाल्यावर श्रद्धा कपूरने छान उकडीच्या मोदकांचाही आस्वाद घेतलाय.

श्रद्धा कपूर म्हणते, "हे दहा दिवस माझे वर्षभरातील सर्वांत आवडीचे दिवस आहेत. बाप्पाचं माझ्या मनात खास स्थान आहे."

"बाप्पा म्हणजे जवळचा मित्रच. तो आपल्या सगळ्या समस्यांचं निराकरण करून, प्रत्येक गोष्ट योग्य पद्धतीनं करतो. लहानपणापासून हा उत्सव आणि त्याच्या खूप आठवणी आहेत. आम्ही सगळी भावंडं आरतीसाठी एकत्र असायचो", असं तिने म्हटलं आहे.

"माझी आजी मला पहिला मोदक द्यायची आणि ती माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट असायची", असंही श्रद्धा कपूरने म्हटलं आहे.

पुढे श्रद्धा कपूर म्हणते, "यंदा आम्ही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करत आहोत. माझी मावशी तेजस्विनी कोल्हापूरे यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही हा उत्सव साजरा करतोय. माझ्यासाठी हे दहा दिवस नेहमीच अविस्मरणीय असतात", असं तिने म्हटलंय.

shraddha kapoor/instagram