मुंबई तक
अहमदाबाद कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतीय संघाचा पहिला डाव 571 धावांवर संपला.
खरं म्हणजे भारताच्या पहिल्या डावात श्रेयस अय्यर फलंदाजीला आला नव्हता. बीसीसीआयनेही याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, तिसऱ्या दिवसाचा सामना संपल्यानंतर श्रेयस अय्यरने पाठीच्या खालच्या भागात दुखत असल्याचं सांगितलं.
यावेळी श्रेयसला तपासणीसाठी नेण्यात आलं. सध्या तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे.
पाठीच्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठीच्या संघातून बाहेर जाण्याची शक्यता आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 17 मार्च रोजी वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.
श्रेयस अय्यरला दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतूनही बाहेर जावं लागलं होतं.