कुंभार कन्येसोबत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या योगदंडाचा झाला 'अक्षता सोहळा'

मुंबई तक

बोला एकदा भक्तलिंग हर्रर्रर्र बोला हर्रर्रर्र च्या जयघोषात लक्ष लक्ष नयनांनी अनुभवला श्री शिवयोगी सिद्धारमेश्वरांचा अक्षता सोहळा...

विजयकुमार बाबर

दोन वर्षांच्या कोरोना निर्बंधानंतर पहिल्यांदाच लाखो भाविकांनी सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवायोगी सिद्धारमेश्वरांच्या अक्षता सोहळ्याला हजेरी लावलीय.

मंदिर परिसरातील संमती कट्ट्यावर कुंभार कन्येसोबत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या योगदंडाशी प्रतिकात्मक विवाह सोहळा पार पडला आहे.

हिरेहब्बू वाड्यातून वाजत गाजत निघालेले मानाचे सात नंदी ध्वज संमती कट्ट्यावर दाखल झाल्यानंतर या 'अक्षता सोहळ्या'स सुरुवात झाली.

900 वर्षांची परंपरा असणाऱ्या या सोहळ्याला महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र आणि तेलंगनातून मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते.

अक्षता सोहळ्याला सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी केंद्रीय गृह मंत्री सुशीलकुमार शिंदे, त्यांच्या पत्नी उज्वलाताई शिंदे हे सहभागी झाले होते.