Shubhman Gill : आधी 'ती' सारा आता, 'ही' सारा... गिलच्या मनात नेमकी कोण?

मुंबई तक

भारताचा सलामीवर फलंदाज शुभमन गिलने पुन्हा एकदा दणदणीत शतक ठोकलं.

श्रीलंकेविरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात शुभमनने उत्कृष्ट कामगिरी करत लक्ष वेधून घेतलं.

शुभमन क्रिकेटबरोबरच डॅशिंग स्टाईल, लूक्स आणि लव्ह अफेअरसाठीही नेहमी चर्चेत असतो.

सध्या गिलचं चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे सारासोबतच्या रिलेशनच्या चर्चा.

असं म्हटलं जातंय की, शुभमन अभिनेत्री सारा अली खानला डेट करतोय.

शुभमन आणि सारा हॉटेलमधून एकत्र बाहेर पडताना दिसले होते. त्यामुळेच डेटिंगची चर्चा सुरू झाली.

शुभमनचं याआधी सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबतही नाव जोडलं गेलं होतं.

मात्र, शुभमनने ना सारा तेंडुलकरबद्दलच्या चर्चा दुजोरा दिला, ना आता सारा अली खानच्या रिलेशनशिपबद्दल भाष्य केलंय. त्यामुळे ही गोष्ट चर्चेपुरतीच राहिली आहे.