Shweta Nanda: बिग बींच्या लेकीची प्रचंड महागडी बॅग... किंमत ऐकून व्हाल हैराण!

मुंबई तक

सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर अबू जानी संदीप खोसला यांनी नुकतंच एका ग्रँड पार्टीचं आयोजन केलं होतं.

यावेळी बिग बींची लेक श्वेता बच्चन नंदाही दिसली. अशा अनेक कलाकारांनी यावेळी हजेरी लावली.

या ग्रँड पार्टीत श्वेता बच्चनच्या आउटफिटपेक्षा तिच्या महागड्या बॅगने लोकांचं लक्ष वेधून घेतलं.

श्वेताने लग्जरी ब्रँड 'शनेल'ची ही महागडी हँडबॅग कॅरी केली होती.

या ब्रँडेड बॅगची किंमत जवळजवळ 5,58,977 रूपये सांगितली जात आहे.

श्वेताचं आउटफिटबद्दल सांगायचं झालं तर, तिने शिमरी बेज रंगाचा बॅक स्लिट बॉडीकॉन गाउन परिधान केलेला.

श्वेता बच्चन या आउटफिटमध्ये खूप सुंदर दिसत होती. यावर तिने मॅचिंग कानातले आणि डार्क मेकअप केला होता.