विज बिलापासून सुटका मिळवण्यासाठी लावा सोलर पॅनल; सरकार देत आहे इतके पैसे

मुंबई तक

जर तुम्ही घराच्या छतावर सोलर पॅनल लावले तर तुमची वीज बिलातून सुटका होईल.

सर्व प्रातिनिधीक फोटो

सरकार हरित ऊर्जेला प्रोत्साहन देत आहे आणि त्याअंतर्गत सोलर पॅनेल बसवण्यासाठी सबसिडी देत ​​आहे.

सोलर पॅनल बसवण्यापूर्वी तुमच्या घरातील दैनंदिन विजेच्या वापराची माहिती घ्या.

तुम्ही 2-3 पंखे, एक फ्रीज, 6-8 एलईडी लाईट्स, एक पाण्याची मोटर आणि वीजेसह टीव्ही चालवता. मग यासाठी तुम्हाला दररोज 6 ते 8 युनिट वीज लागेल.

6 ते 8 युनिट वीज निर्मितीसाठी, तुम्हाला दोन किलोवॅटचे सौर पॅनेल बसवावे लागतील.देशात सौर ऊर्जेला चालना देण्यासाठी ऊर्जा मंत्रालयाने सौर रूफटॉप योजना सुरू केली आहे.

जर तुम्ही रुफटॉप सोलर पॅनल तीन किलोवॅटपर्यंत बसवले तर तुम्हाला सरकारकडून 40 टक्क्यांपर्यंत सबसिडी मिळेल. 10 किलोवॅट क्षमतेच्या सोलर पॅनलवर 20 टक्के सबसिडी उपलब्ध आहे.

दोन किलोवॅटचे सोलर पॅनलसाठी सुमारे 1.20 लाख रुपये खर्च येईल. पण सरकार तुम्हाला 40 टक्क्यांपर्यंत सबसिडी देईल. तुम्हाला फक्त 72 हजार रुपये खर्च करावे लागतील. सोलर पॅनलची लाईफ 25 वर्ष असते.