मुंबई तक
वाइन बनवणारी कंपनी सुला विनयार्ड्स (Sula Vineyards) सध्या चर्चेत आहे.
सुला हा स्वदेशी ब्रँडपैकी एक प्रसिद्ध ब्रँड आहे, ज्याने सामान्य भारतीयांपर्यंत वाईन पोहचवली आहे.
सुला विनयार्ड्सची स्थापना राजीव सामंत यांनी 1999 मध्ये केलेली. त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे.
भारतात परतल्यावर नाशिकमधील वडिलोपार्जित जमीन पाहण्यासाठी गेल्यावर त्यांना वाईन उद्योगात पाऊल ठेवण्याची कल्पना सुचली.
मित्रांकडून 5 कोटी रुपये जमवून राजीवने नाशिकमध्ये त्याच्या 30 एकर वडिलोपार्जित जमिनीवर सुला व्हाइनयार्डची पायाभरणी केली.
राजीवच्या याच प्रयोगचा परिणाम असा झाला की, अनेक वाईन कंपन्याही भारतात अस्तित्वात आल्या.
सुला हे नाव राजीवची आई सुलभा यांच्याकडून प्रेरित आहे. आज Sula Vineyards 1800 एकरमध्ये आहे.
वाइन पर्यटन व्यवसायाला चालना देण्याचे श्रेयही सुला यांना जाते. नाशिकमध्ये असलेल्या कंपनीच्या वाईनरीला दरवर्षी लाखो लोक भेट देतात.
राजीव यांनी सुला कंपनी तयार करण्यासाठी प्रचंड संघर्ष केला पण आता त्यांच्या या कंपनीला सोन्याचे दिवस आले आहेत.