Prithvi Shaw: 'पृथ्वी'ची 'ती' खेळी पाहून 'सूर्या' म्हणाला...

मुंबई तक

टीम इंडियाचा युवा फलंदाज पृथ्वी शॉने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये जबरदस्त खेळी खेळल्या आहेत.

अनेक चांगल्या खेळी करुन आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये त्याची निवड मात्र होत नाहीए.

परंतु, रणजी ट्रॉफीमध्ये त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेणारी कामगिरी केली आहे.

रणजी ट्रॉफीच्या आसाम विरुद्धच्या सामन्यात पृथ्वीने एक जबरदस्त कामगिरी केली आहे.

पृथ्वीने आसामविरुद्ध पहिल्या दिवशीच फलंदाजी करत द्विशतक झळकावलं. यानंतर दुसऱ्या दिवशी त्रिशतक ठोकलं.

शॉने 383 चेंडूत 49 चौकार आणि 4 षटकारांसह 379 धावा केल्या. या कामगिरीचे सूर्यकुमार यादवनेही कौतुक केलंय.

सूर्यकुमारने ट्वीट करत म्हटलं की, 'पृथ्वी शॉ 379. (खेळाप्रती चांगला वेडेपणा)' असे म्हणत त्याचे कौतुक केले.